🕒 1 min read
नवी दिल्ली : शुक्रवारी(२९ ऑक्टो.)‘डिलिव्हरिंग डेमोक्रसी’ या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या चर्चासत्राची सांगता झाली. यावेळी बोलत असतांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांचे भरभरून कौतुक केले. साडेबारा वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला. त्यांनी सर्व समाजाला सहभागी करून घेत विकास साधला व धर्मनिरपेक्ष सत्तेला नवे परिमाण दिले. मग, पंतप्रधान झाल्यावर त्यांनी ‘सबका विश्वास, सबका प्रयास’ची जोड देत लोकशाही व्यवस्था मजबूत केली, असे ते म्हणाले.
यावेळी बोलत असतांना सिंह म्हणाले की,’महात्मा गांधीजींनंतर लोकांच्या मनावर पकड साधणारा मोदींशिवाय दुसरा लोकनेता नाही. गांधीजी आध्यात्मिक होते, तसे मोदीही आध्यात्मिक आहेत. त्यांची लोकांची सेवा करण्याची सातत्याने धडपड सुरू असते. अध्यात्म म्हणजे मनाचे मोठेपण. ज्या व्यक्तीचे मन मोठे असते तोच पंतप्रधान हातात झाडू घेऊन स्वच्छता करू शकतो, कोणाचे पाय धुवू शकतो. मोदींसाठी राजकारण ही दुय्यम बाब असते. मोदी म्हणजे २४ कॅरेटचे सोने आहे. त्यांच्या हेतू आणि प्रामाणिकपणाबद्दल कोणी शंका घेऊ शकत नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही.’
दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा मुद्दा भाजपच्या प्रत्येक जाहीरनाम्यात समाविष्ट केला जात असे. २०१९ मध्ये पुन्हा सत्तेवर आल्यावर मोदींनी चुटकीसरशी ३७० रद्द केले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे मनोधैर्य मोडून पडले. सर्जिकल स्ट्राइक करून सीमापार धडा शिकवला’, असेही ते म्हणाले. तसेच लोकशाही विकसित करण्याच्या मोदींच्या प्रयत्नांची माहिती लोकांना झाली पाहिजे, या उद्देशाने अशी आणखी किमान दहा चर्चासत्रे घेतली जाणार असल्याची माहित राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी यावेळी दिली. या चर्चासत्रात १६६ प्रतिनिधी सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- विंडीजचे आव्हान कायम; बांगलादेशवर रोमहर्षक विजय
- बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आजही आहे, इथं कोणावर अन्याय होणार नाही- संजय राऊत
- वळसे पाटील कोरोनावर मात करून लवकरच सेवेत रुजू व्हाल, याची खात्री- अजित पवार
- आर्यन खानच्या मदतीला जुही चावला आली धावून म्हणाली…
- पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान मॅचदरम्यान फॅन्समध्ये तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
