नवी दिल्ली : कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. यात कोरोनाची लक्षणे असूनही काही रुग्णांची कोरोना चाचणी निगेटीव्ह येत होती. अशा परिस्थितीत रुग्ण जास्त गंभीर होणे, रुग्ण बिनधास्त होणे तसेच बाहेर फिरल्याने इतरांना संसर्ग होणे अशी प्रकरणे समोर येत होती. त्यामुळे गुजरात सरकारने कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी रुग्णांना पॉझिटीव्ह रिपोर्टची अनिवार्यता संपवली होती. त्यामुळे लक्षणे असलेल्या रुग्णांवरही उपचार सुरू होण्यास मदत झाली. याचीच अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारच्या वतीनेही देण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता संशयित रुग्ण देखील कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल होऊ शकतील. त्यांना संशयित रुग्णांच्या वार्डमध्ये ठेवण्यात येईल. रुग्ण इतर शहराचा असेल तरीही कोणत्याही रुग्णाला सेवा नाकारता येणार नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. यामध्ये ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा देखील समावेश आहे.
रुग्णाकडे औळखपत्र नसेल तरीदेखील हॉस्पिटल रुग्णाला प्रवेश नाकरू शकत नाही. रुग्णाला आवश्यक असेल त्या सुविधा आणि आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी रुग्णालयांवर सोपवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारच्या ‘या’ महत्त्वपूर्ण योजनेत एमआयएम खा.जलील यांचे विशेष लक्ष!
- ‘तुम्ही फक्त लस पुरवा, २४ तास काम करून लसीकरण मोहीम फत्ते करतो’
- राज्यात लॉकडाऊन वाढणार ? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी मोदी, राष्ट्रपतींकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करू नये’
- रिक्षाचालकांवर जिल्हाधिकारी कारवाई करतात, मग वाहतूक पोलीस झोपतात का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
