Share

‘तुम्ही फक्त लस पुरवा, २४ तास काम करून लसीकरण मोहीम फत्ते करतो’

Published On: 

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनतेने अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे अनेक नागरिक शक्य तितक्या लवकर जाऊन लसीकरण करुन घेत आहेत.

पण सध्या राज्यात लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला आहे. मुंबईतही तशीच परिस्थिती आहे. १८-४४ वयोगटातील नागरिकांना केलं जाणारं लसीकरण तर नावालाच आहे. लसीच्या तुटवड्यामुळं वेगानं लसीकरण होत नसल्याची तक्रार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसंच लस उपलब्ध करून दिल्यास २४ तास ३ शिफ्टमध्ये काम करूनही लसीकरण करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, संपूर्ण देशभरात ज्या पद्धतीनं लस पुरवठा होत आहे, तो अत्यंत कमी आहे. राज्याचा विचार करता महाराष्ट्र सरकारला लसींचा जो साठा दिला जातो, त्यापैकी सर्वाधिक साठा मुंबईसाठी मिळतो. मात्र मुंबईत आम्हाला उपलब्ध होणारा लसींचा साठाही अत्यंत कमी पडत आहे. आम्हाला जर सरकारनं मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करून दिला तर आरोग्य कर्मचारी २४ तास ३ शिफ्टमध्ये काम करून लसीकरण मोहीम पूर्ण करतील, अशी तयारीही किशोरी पेडणेकर यांनी दाखवली आहे.

दरम्यान कालपर्यंत लसीकरण मोहिमेत १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, काल ५ मे रोजी महाराष्ट्रात १५८६ लसीकरण केंद्रांद्वारे एकूण २ लाख ५९ हजार ६८५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील १ लाख ५३ हजार ९६७ नागरिकांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!