मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारनं लागू केलेले कडक निर्बंध १५ मेपर्यंत वाढविण्यात आले आहेत. पण १५ मेनंतर निर्बंध उठणार का ? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
राज्यात अजूनही दैनंदिन पातळीवर ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे परिस्थिती हवीतशी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत आणखी काही दिवस वाढ करावी लागू शकते, असं विधान राजेश टोपे यांनी केलं आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत ५४ हजार २२ नवे रुग्ण आढळून आले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यतील नव्या कोरोना रुग्णवाढीची आकडेवारी ५० हजारांच्यावरच राहिलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
‘राज्यात रोज ५० हजारांच्यावरच रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हवा तसा कमी झालेला नाही. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यांमध्ये दर कमी झाला आहे. पण परिस्थिती निवळलेली नाही. त्यामुळे निर्बंध काढून घेण्यात आले तर परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जाऊ शकते. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढते आहे. लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत १५ मेपर्यंत पुढील चित्र स्पष्ट होईल’, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- रिक्षाचालकांवर जिल्हाधिकारी कारवाई करतात, मग वाहतूक पोलीस झोपतात का?
- ‘नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे गुलाम, गुलामाच्या बोलण्याला फारसं महत्त्व नसते’
- उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या प्रकृतीची माहिती कुटुंबियांना देण्याची होतेय मागणी
- भारतीय अधिकाऱ्यांचे कौतुक केल्याने पाकचे पंतप्रधान इम्रान खान अडचणीत
- चोरट्या मार्गाने तळीरामांना दारू विकणाऱ्या ३८ जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, ९ महिलांचा समावेश


