मुंबई : गेल्या काही महिन्यापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा नव्याने डोके वर काढत आहे. यादरम्यान आयपीएल स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाल्यानंतर जवळपास एक दीड महिना कोरनाच्या संसर्गापासुन क्रिकेट दुर होते. मात्र गेल्या काही आठवड्यात क्रिकेटमध्ये सातत्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
इंग्लंड आणि श्रीलंकेच्या क्रिकेटपटूनंतर आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटुला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून ऑस्ट्रेलियाच्या संघाबाहेर असलेला पीटर हॅन्ड्सकॉम्ब याला कोरनाची लागण झाली आहे. पीटर सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट स्पर्धेत मिडलसेक्स संघाचे प्रतिनिधीत्व करतो. कोरोनाची लागण झाल्यामुळे पीटर लँकशायरविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. पीटर सध्या विलगीकरणात असुन तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे.
यापुर्वी इंग्लंड आणि श्रीलंका टी-२० मालिकेतील सामनाधीकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर इंग्लंड श्रीलंका एकदिवसीय मालिकेनंतर इंग्लंडच्या तीन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या ४ सदस्यांना कोरनाची लागण झाली होती. यामुळे पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडच्या संघाने संपुर्ण नवा संघ उभा केला. तर इंग्लंड दौऱ्यावरुन परतलेल्या श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर यांना कोरोनाची लागण झाली होती.
महत्त्वाच्याा बातम्या
- मी स्वतःला जगातील सर्वोत्तम टेनिसपटू मानतो : जोकोविच
- ‘योगींनी दोन मुलांऐवजी जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे’
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- यशोमती ठाकूर यांची मध्यस्थी अन् भूमीपुत्रांवरील अन्याय दूर ; 48 तरुणांची वाचवली नोकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

