Share

‘ते राणीच्या बागेत आंदोलन करत नव्हते, शिवसेना भवनाची गरिमा आहे’; शिवसेना नेता संतापला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. याचे कारण होते अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला आहे. भाजप युवा मोर्चाने सेना भवनावर कूच करताच, शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.

सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. एकमेकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर शिवसैनिकांनी तिकडे धाव घेतल्यानंतर, दोन्ही पक्षात प्रचंड धुमश्चक्री उडाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली. मात्र, शिवसेना भवनापासूनच्या काही किलोमीटर अंतरावर मोठा जमाव अडवण्यात आला असला तरी जे शिवसेना भवन परिसरात कार्यकर्ते आले त्यांच्यात संघर्ष सुरु आहे. यामुळे परिसरात तणाव वाढला आहे.

यावर शिवसेना नेते सचिन अहिर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपचे कार्यकर्ते राणीच्या बागेत आंदोलन करत होते का ? ते शिवसेना भवन आहे. या शिवसेना भवनाबाबत सर्व कार्यकर्त्यांच्या मनात एक आदराचं स्थान आहे. कोणीही येऊन आंदोलन करेल हे चालणार नाही. जेव्हा कार्यकर्त्यांना समजलं भाजपचे कार्यकर्ते तोडफोड करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे हे अडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कृती केली. रामजन्मभूमी भूमिकेबाबत कोणीही शिवसेनेला शिकवण्याची गरज नाही.’ असा इशारा सचिन अहिर यांनी देतानाच शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळण्याआधी आणि मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर महाविकास आघाडी केल्यानंतरही शिवसेनेनं रामजन्मभूमीत जाऊन दर्शन घेतलं होतं असं देखील त्यांनी नमूद केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!