मुंबई : अजय देवगण (Ajay Devgan) दिग्दर्शन असलेल्या ‘मे डे’ (Mayday) या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. अजय देवगणने सिनेमाच्या बदललेल्या नावाची घोषणा नुकतीच केली आहे. या शिवाय सिनेमातील मुख्य कलाकार म्हणजे स्वत: अजय देवगण तसचं अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रकुल प्रीत सिंहचा सिनेमातील फर्स्ट लूकदेखील शेअर केलाय.
दरम्यान अजय देवगणने सोशल मीडियावर सिनेमातील कलाकारांचा फर्स्ट लूक शेअर केलाय. हे फोटो शेअर करत त्याने लिहिलं, आता या सिनेमाचं नाव बदललं असून ‘रनवे ३४’ असं करण्यात आलंय. ‘मे डे’ (Mayday) आता ‘रनवे ३४’ (Runway 34) झाला आहे. हा थ्रीलर सिनेमा खऱ्या घटनांशी प्रेरित आहे असून तो माझ्या खूप जवळचा आहे. यामागे अनेक कारणं आहेत. यासोबतच त्याने एक नोटही शेअर केलीय. यात त्याने लिहिलं,’ आपले डोळे बंद करा आणि त्या क्षणांचा विचार करा जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच… तो म्हणजे जेव्हा आपल्याला आपण संपूर्ण जग जिंकलो आहोत असं वाटतं मात्र दुसऱ्याच क्षणी आपण खूप हताश झाल्यासारखं वाटतं’
https://www.instagram.com/p/CW2lL1IodMK/?utm_source=ig_web_copy_link
या सिनेमाच्या पोस्टरवरुनच सिनेमात अजय आणि रकुल एका वैमानिकाच्या भूमिकेत झळकणार असल्याचं स्पष्ट होत आहे. तर अमिताभ बच्चन मात्र कोणत्या भूमिकेत झळकणार हे अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे. ‘रनवे ३४’ हा सिनेमा २०२२ सालामधील ईदला म्हणजेच २९ एप्रिलला प्रदर्शित होणार असून सिनेमात बिग बी आणि रकुल प्रीत सिंह सोबतच बोमन ईरानी, अकांक्षा सिंह, अंगीरा धर हे कलाकारही झळकणार असल्याने चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- Mumbai: महापौरांच्या दालनातून फायली गायब झाल्याची धक्कादायक माहिती उघड
- सारा अली खानने बॉडीगार्डला सुनावले; कारण वाचून कराल कौतुक
- खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ संसद भवन परिसरात विरोधकांची निदर्शने
- नितेश राणेंनी ठाकरेंना पाठवले पत्र; म्हणाले, फ्रंटलाईन वर्कर्सच्या कामाचे श्रेय….
- निलंबन मागे घेण्यासाठी शिवसेना माफी मागणार? प्रियांका चतुर्वेदींची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

