पुणे : १०० कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आले आहे. १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली असून लवकरच अजून एक गौप्यस्फोट होणार अशी माहिती दिली आहे.
यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना सोमय्या म्हणाले की,’अखेर अनिल देशमुखला ईडीने अटक केली आहे. त्यांचा १०० कोटींहून अधिकचा गैरवापर असून कॅशही सापडली आहेत. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे १०० कोटींची वसुली कोणाच्या खात्यात कशी गेली. त्याची पण माहिती बाहेर येणार अनिल देशमुख नंतर अनिल परब’, असा इशाराही यावेळी सोमय्यांनी दिला आहे.’
दरम्यान, १०० कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना ४ ते ५ वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर काल(१ नोव्हें.)अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ईडीचे वरीष्ट आधिकारी दिल्लीतून मुंबईत दाखल झाले. त्यांनी देशमुखांची चौकशी केली आणि अखेर १३ तासांनंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- IPL 2022: धोनीचा मोठा खुलासा म्हणाला..
- संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने नागरिकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या- एच. के. पाटील
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- इंग्लंडचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
- ‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत हरिकाची पोगोनिनाविरुद्ध आघाडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

