मुंबई : अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या रिलेशनशिपमुळे बराच चर्चेत असतो. जेवढा तो त्याच्या रिलेशनशिप मुळे चर्चेत असतो तेवढाच तो त्याच्या अभिनयामुळे देखील चर्चेत असतो. तसेच रणबीर कपूरला फिल्म इंडस्ट्रीचा चाॅकलेट बाॅय म्हणून देखील ओळखलं जातं. पण रणबीर आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याला कारण ठरलीय त्याची ‘रेंज रोवर’ कार.
रणबीरकडे आलिशान रेंज रोवर कार आहे. ही कार मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही गाडी ‘नो पार्किंग’ मध्ये उभी होती. त्यामुळे पोलिसांनी रणबीरची गाडी एका दिवसासाठी ताब्यात घेतली होती. मुंबई पोलीस ट्रॅफिकच्या बाबतील खूप कडक आहेत मग तो अभिनेता असला तरी सर्वाना एकच नियम त्या मुळे रणबीर या सगळ्याचा प्रॉब्लेम देखील झाला.
दरम्यान रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, रणबीरच्या चाहत्यांना त्याच्या आगामी ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटांची उत्सुकता आहे. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन , आलिया भट, नागार्जुन, डिंपल कपा़डिया यांचा दमदार अभिनय पहायला मिळणार आहे. तूर्तास मात्र त्याच्या गाडीच्या नो पार्किंगची चर्चा रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अहिल्यादेवींचा इतका आदर वाटतो तर पवारांनी धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही?’
- ‘या’ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा, ग्राहकांचे तब्बल दीड कोटी लाटले…
- १५०० स्वेअर फूटापर्यंतच्या बांधकामाला परवानगीची गरज नाही- शिंदे
- औरंगाबादचे नामकरण लवकरच संभाजीनगर, एकनाथ शिंदेंची माहिती
- “गोध्राकांड आंदोलनाने मोदी व शहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविले”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

