Share

जालना-बदनापूर मार्गावर अपघातात ट्रॅक्टरचालक जागीच गतप्राण

Published On: 

जालना : बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथून बदनापूरकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून येत असलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. या वेळी ट्रॅक्टरचालक खाली पडल्याने टायरखाली आल्याने जागीच गतप्राण झाला. बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीसलाही ट्रकचालकाने धडक दिली. यानंतर ट्रकचालक तेथून पसार झाला.

जालना तालुक्यातील दरेगाव येथील रहिवासी ज्ञानदेव पंढरीनाथ खर्डेकर हे ट्रॉली नसलेले ट्रॅक्टर घेऊन बदनापूरकडे येत होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. त्यामुळे ट्रॅक्टरचालक खर्डेकर ट्रॅक्टरखाली फेकले गेले. आणि ट्रॅक्टरच्याच टायरखाली चिरडून जागीच गतप्राण झाले. शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोर हा अपघात घडला.

यानंतर ट्रकचालक फरार झाला. परिसरातील लगेच घटनास्थळी गर्दी केली आणि घटनेची माहिती पोलीसांना दिली. आपघाताविषयी माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, राधकिसन हरकळ, संग्रामसिंह ठाकूर, घोडके, बहुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. फरार ट्रकचालकाचा शोध सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!