🕒 1 min read
अभिनेता आफताब शिवदासानीने पत्नी निन दुसांज हिच्याशी पारंपरिक पद्धतीने पुनर्विवाह केलाय.आफताब आणि निन यांनी ५ जून २०१४ रोजी त्यांच्या विवाहाची नोंदणी केली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी रितीरिवाजानुसार लग्न केले नव्हते.आफताबच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शाही सोहळ्यात हिंदू विवाहपद्धतीनुसार या दोघांनी लग्न केले. आफताब हत्तीवरून तर निन मेण्यातून लग्नमंडपापर्यंत पोहोचली. वर-वधूच्या पोशाखात हे जोडपे एखाद्या राजा-राणीप्रमाणे दिसत होते. श्रीलंकेतील अनंतारा पीस हेवन येथे हा विवाहसोहळा संपन्न झाला.लग्नाला दोघांचेही नातेवाईक आणि फक्त जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

