Share

कौतुकास्पद : धारावीत आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी शेकडो संघ स्वयंसेवक उतरणार मैदानात

Published On: 

मुंबई : राज्यात शनिवारी (6 जून) 2234 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 37 हजार 390 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे.

शनिवारी कोरोनाच्या 2739 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 82 हजार 968 इतका झाला असून हा आकडा वाढण्यापासून रोखण्यात सरकारला अपयश येताना दिसत आहे. दरम्यान, यापैकी सध्या 42 हजार 600 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत आता आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यकर्ते मैदानात उतरणार आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेचा भार हलका होण्यास मदत होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली निरामय सेवा फाउंडेशन, सेवांकुर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तब्बल ५०० कार्यकर्ते कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या धारावी परिसरात नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग करणार आहेत. यात डॉक्टरांचाही समावेश आहे. धारावीच्या कामराज इंग्लिश हायस्कूलमध्ये हे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आपत्तीच्या काळात प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहिल्याचे आपण पाहिले आहे. पुण्यात आणि देशाच्या इतर भागात देखील अशाच प्रकारे आरोग्य यंत्रणेच्या मदतीला संघ धावून आल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. अनेक ठिकाणी अन्नधान्य पोहचवणे असेल किंवा इतर अडचणीत सापडलेल्या नागरिकांना संघाने भरभरून मदत केली आहे.

सलाम तुमच्या कार्याला ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोरोना आपत्तीच्या काळात अप्रतिम असे सेवाकार्य

आनंदाची बातमी : UPSC परीक्षेची नवीन तारीख जाहीर  

१७० कामगारांना घरी जाण्यसाठी सोनूने केली खास चार्टर्ड विमानाची सोय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!