मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सुद लॉकडाऊन काळात इतर राज्यांमधील अडकलेल्या कामगारांना आपल्या घरी जाण्यासाठी मदत केली आहे. आतापर्यंत स्वतःच्या खर्चाने सोनूने कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार येखील कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्याची व्यवस्था करुन दिली आहे.
हार्दिक पंड्या बाप होणार हे पाहून नताशाचा एक्स बॉयफ्रेंड म्हणाला…
लॉकडाउनमध्ये सर्व व्यवस्था ठप्प झालेली असल्यामुळे केंद्र सरकार हळुहळु सर्व गोष्टी सुरु करण्याच्या तयारीत आहे. तरीही सोनूने कामगारांना आपल्या घरी पाठवण्याचं काम सुरुच ठेवलं आहे. सोनूच्या या दानशूर वृत्तीचे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्याचे कौतुकही केले आहे.
सीमावादावर तोडगा काढण्यासाठी भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची बैठक
उत्तराखंडातील देहरादून येखील १७० कामगारांना सोनूने खास चार्टर्ड विमानाची सोय केली आहे. Air Asia कंपनीचं हे चार्टर्ड विमान १७३ कामगारांना घेऊन मुंबई विमानतळावरुन शुक्रवारी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान उडालं. ४ वाजून ४१ मिनीटांनी हे सर्व कामगार देहरादून विमानतळावर पोहचले होते. Air Asia कंपनीच्या प्रवक्त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती दिली.


