टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या सोबत संघाशी संबंधित अनेक संस्थांच्या माध्यमातून या कोरोना संक्रमणाच्या काळात प्रचंड मोठे काम सुरू आहे.पुणे आणि बाहेरील परिसरात जवळपास जवळपास २ हजार लोकांना दररोज खिचडी वाटप केली जाते आहे.तर शहरात सफाई कर्मचारी जे अहोरात्र मेहनत करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहेत. त्यांना लॉकडाऊन मुळे चहा आणि नाष्टा मिळायला बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो.
नेमकी हीच अडचण ओळखून संघामर्फत सफाई कामगारांना चहा आणि नाष्टा दिला जातो आहे.त्याचबरोबर आतापर्यंत पुणे शहरात २५ हजार ५०० जेवणाचे पाकिटे,२ हजार ५०० मास्क आणि बऱ्याच शिधा पाकिटे वाटप केली आहेत. सातारा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबाला धान्य वितरण केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १०५ जिवदया किटस् आणि दररोज २०० लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. नगर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी गरीब लोकांना कोरडा शिधा वितरित केला जात आहे.
त्याचबरोबर नशिक जिल्ह्यात बऱ्याच लोकांना जेवणाची व्यवस्था संघ स्वयंसेवक आणि इतर समविचारी कार्यकर्त्यांमार्फत अन्नाचे वितरण केले जाते आहे. त्यामुळे नेहमी संकट कालीन आपल्या देशबांधवांच्या सेवेसाठी तत्पर असणारा संघ आजही लोकांच्या सेवेत तत्पर आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

