मुंबई: जगात आणि त्याच बरोबर देशात कोरोना प्रमाणेच ओमायक्रॉन या विषाणूचा देखील वेगाने प्रसार होत आहे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशांनाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचे अनेक रुग्ण समोर आले आहेत. राज्यात देखील ओमायक्रॉनचे अनेक रुग्ण सापडले असल्याने राज्य सरकार आता पुन्हा एकदा तयारीला लागले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना पत्र पाठवले आहे.
राज्यात अनेक शहरांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत अशा लोकांना सुद्धा ओमायक्रॉनची लागण झाली असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे फ्रंटलाईन वरकर्स म्हणजेच कोरोना योद्ध्यांना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनायोद्ध्यांना तिसरा डोस देखील द्यावा का या बाबत विचार सुरू आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना एक पत्र लिहलं आहे. त्यातून त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत.
I’ve written to Health Minister (GoI) Shri @mansukhmandviya ji, a few suggestions that have come from various interactions with doctors and those closely observing the covid situation closely, so that we can protect our citizens in the light of newly emerging variants. pic.twitter.com/XZcdXFNOYM
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 7, 2021
कोरोना त्याच सोबत ओमायक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने आता कोरोनायोद्ध्यांन तिसरा डोस देण्यात यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मनसुख मांडविया यांच्याकडे केली आहे. आता राज्यात १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण सुरू आहे, मात्र लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं आहे. हे विचारात घेऊन लसीकरणाची वयोमर्यादा १८ वरून १५ वर्षे करावी, त्याच सोबत लसीकरणामधील अंतर देखील कमी करण्यात यावे ज्यामुळे लसीकरणाला वेग येण्यास आणखी मदत होईल, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस अडचणीत?
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचे केंद्र सरकारला पत्र
- दुसऱ्याचे अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी का भरत नाही?- दीपक केसरकर
- ‘राणेंना एवढे महत्त्व कशाला’; पेडणेकरांचा खोचक सवाल
- ‘तोंड दिलं म्हणून काहीही बोलू नका, अजित पवारांना जातीयवादी…’


