मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांची विधिमंडळ गटनेतेपदी केलेली निवड रद्द करुन उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची नियुक्ती केली. यासोबतच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांच्या गटातील आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून दुसरीकडे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांची निवड, बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेची परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय, शिंदे सरकारचा बहुमताचा प्रस्ताव या सर्व मुद्द्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असून दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद सुरु आहे.
दरम्यान सरन्यायाधीश रमण्णा यांनी आपण हायकोर्टात का गेला नाहीत असा प्रश्न शिंदे गटाला केला आहे. यावर हरिश साळवे यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अपात्रतेची नोटीस बजावल्याने त्यांना तात्काळ रोखणं गरजेचं असल्यामुळे सुप्रीम कोर्टात दाद मागितल्याचे म्हटले.
तर काही याचिकांमधील मागण्या अर्थहीन असून संबंधित कागदपत्रं सादर करण्यासाठी पुढील आठवड्यापर्यंत वेळ द्यावा, अशी मागणी हरिश साळवे यांनी केली आहे. यावर सरन्यायाधीशांनी वेळेची समस्या नाही, परंतु काही घटनात्मक मुद्दे आहेत ज्यांचे निराकरण केले पाहिजे असे सांगितले. दरम्यान अभिषेक मनू सिंघवी यांनी यावर आक्षेप घेतला असून वेळ वाढवून दिला जाऊ नये अशी भूमिका घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “हे तर जो बायडेनचं घरही ताब्यात घेतील”; एकनाथ शिंदे गटावर संजय राऊतांची टोलेबाजी
- Shinde Vs Thackeray : “…व्यक्तीला मुख्यमंत्रीपद बहाल करावं या कल्पनेत आपण आहोत का?”, शिंदे गटाची कोर्टात विचारणा
- Sanjay Raut -“हे तर जो बायडेनचं घरही ताब्यात घेतील” ; एकनाथ शिंदे गटावर संजय राऊतांची टोलेबाजी
- Sanjay Jadhav | “लोभाला मर्यादा असावी” ; शिवसेना खासदार संजय जाधव यांचा शिंदे गटावर निशाणा
- AIMIM : गुगल मॅपकडून औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख; एमआयएम तक्रार दाखल करण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

