🕒 1 min read
पुणे : एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केल्यापासून शिवसेना पक्षामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट झाले असून, दोन्ही गटातील नेते एकमेकांविरोधात सतत आरोप करत असतात. अशातच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिवसेना पक्षाने पुणे, वडगावमध्ये काल जनआक्रोश मोर्चा काढला होतो. त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला एक आव्हान दिलं आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले ?
गद्दारांना मी आव्हान देतो,आपल्या आमदाराकीचा राजीनामा द्या, तुमच्याबरोबच मी सुद्धा राजीनामा देतो. हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढवून दाखवा, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, आज राजकारणाची पातळी खालावली आहे. गणपतीच्या मिरवणुकीत आमदार बंदूक काढतो. हे योग्य नाही.
या ४० गद्दारांनी आमच्यावर कितीही वार केले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. हे ४० गद्दार आज थयथयाट करत आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांनी मोर्चा दरम्यान, राज्य सरकारवरही टीका केली आहे. राज्यातले सरकार हे खोके सरकार आहे. मुळात हे सरकार नसून सर्कस आहे. हे बेकायदेशीर सरकार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीकी –
तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस हे सरकार लवकरच कोसळणार आहे. आज सरकारमध्ये काम करताना आमच्या गटात कोण येते आहे, याकडेच त्याचे लक्ष आहे. मात्र, राज्यातला तरुण रोजगार मागतो आहे, त्याकडे त्यांचे लक्ष नसल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी याठिकाणी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | “खोके सरकारचं लक्ष त्यांच्या गटात कोण येतंय याकडे आहे, मात्र उद्योग…”, आदित्य ठाकरेंचा आक्रोश
- Monica O My Darling | राजकुमार राव आणि हुमा कुरेशी यांची डान्स फ्लोअरला धूम, मोनिका ओ माय डार्लिंगचा टीझर रिलीज
- Chandrashekhar Bawankule | “बारामती मतदार संघात घडी बंद करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केले इरादे
- Viral Video | लग्नापूर्वी नववधू वर्कआउट करण्यासाठी जिममध्ये पोहोचली, पहा व्हिडिओ
- Music Therapy Benefits : गाणी ऐका आणि निरोगी राहा! होय, संगीतामुळे राहू शकता तुम्ही तंदुरुस्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
