बीड : लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी व ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही त्या मतदारराजाचे मन जिंकण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला बुधवारी सोलापुरातून प्रारंभ झाला आहे. येत्या 4 ऑगस्ट रोजी ही यात्रा बीड येथे येत असून या यात्रेत आदित्य ठाकरे हे युवाशक्तीशी ‘आदित्य संवाद’च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे 31 जुलै ते 4 ऑगस्ट या काळात ‘जनआशीर्वाद यात्रे’चा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. रविवार ( दि. 4 ) रोजी आदित्य ठाकरे यांचे बीडमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता के एस के महाविद्यालयात ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते महिला व युवतींना विविध समस्या आणि प्रश्नावर संवाद साधणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
शिवेंद्रराजेंनी दिले आव्हाडांच्या ‘या’ टीकेवर जोरदार प्रत्युत्तर म्हणाले…
सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशाबाबत संजय राऊतांनी केला मोठा खुलासा
बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सेनेत : सचिन अहिर
राज्यातील पावसाची स्थिती जाणून घ्या फक्त एका क्लिकवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

