Share

बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सेनेत : सचिन अहिर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी गृहनिर्माण राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सचिन अहिर यांनी हाती शिवबंधन बांधले.

सचिन अहिर यांनी शिवसेना प्रवेशा दरम्यान, ‘आम्हाला पक्ष फोडायचा नाहीये, तर शिवसेना वाढवायची आहे’ असे अहिर म्हणाले. तसेच दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारा मी कार्यकर्ता आहे, शिवसेना वाढवण्याचे काम मी करेन असं देखील सचिन अहिर म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप – सेना युतीत प्रवेश केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भाजप – सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!