मुंबई : १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
यामुळेच, महाराष्ट्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत दिली जाणार असल्याची घोषणा आज(बुधवार) केली आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत थेट ट्विट करून घोषणा केली होती. मात्र, यानंतर दोन्ही मंत्र्यांना अवघ्या तासाभरात ट्विट डिलीट करावं लागलं होतं. विरोधकांनी यानंतर महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं होतं. तर, काँग्रेसने देखील नाराजी व्यक्त केली होती.
3 days ago, I had deleted the tweet so as to not create a flutter with it. Now that the policy has been approved by the cabinet, this is the right time to share it formally, ensuring there is clarity and a sense of duty.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 28, 2021
दरम्यान, राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी नवं ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी तीन दिवसांपूर्वी केलेलं ट्विट का डिलीट केलं याबाबत देखील खुलासा केला आहे. ‘ तीन दिवसांपूर्वी मी माझं ट्विट डिलीट केलं होतं. कोणताही संभ्रम किंवा गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून मी ट्विट डिलीट केलं होतं. आता मंत्रिमंडळाने मोफत लसीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही बातमी शेअर करण्याची हीच योग्य वेळ आहे,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- प्रेम हे बावरे! पत्नी कोरोनामुक्त झाल्याने पतीकडून डॉक्टरांचा सत्कार
- लॉकडाऊन घ्या आणि घरी बसा, बाकी मेलात तरी ती तुमची जबाबदारी; राणेंची बोचरी टीका
- वेश्या व्यवसाय करणा-या महिलांना शासनाचा आर्थिक आधार; ७ कोटी रुपयांचे अर्थसहाय जमा
- ई-पास प्रणाली तात्पुरती स्थगित करा, आ.सुरेश धसांचे अजित पवारांना साकडे
- IPL सामन्यांवर केंद्राने बंदी आणावी, खेळाडूंनी खजिना जनतेसाठी खुला करावा; मिटकरींची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

