Share

Aditya Thackeray | पोस्टरबाजीवरून आदित्य ठाकरे यांचे सत्ताधारी नेत्यांना प्रत्त्युत्तर म्हणाले…

Published On: 

मुंबई : पावसाळी अधिवेशन खूप रंगलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर त्यामुळे आजही नेते सडकून टोलेबाजी करतील असं दिसून येतं आहे. अधिवेशनाला आता सुरूवात झाली असून युवराजांची दिशा चुकली, असं म्हणत सत्ताधारी पक्षनेत्यांनी शिवसेना पक्षाचे आमदार आणि माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला-

दिलेली स्क्रिप्ट त्या बिचाऱ्यांना वाचायला लागत असेल, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी जी काही पोस्टरबाजी केली त्यावरून त्यांच्यावर झालेले संस्कार दिसून येत आहेत. पोस्टरबाजी करण्यापेक्षा तेच जर त्यांनी जनतेच्या समस्यांकडे लक्ष दिलंं तर जनतेचं भलं होईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दबाव टाकला तरी शिवसेना उभी राहणार-

तसेच आमच्यावर कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला, कितीही आमचा आवाज संपवण्याचा प्रयत्न केला गेला तरी, शिवसेना ही उभी राहील आणि आम्ही ही फिरत राहू. जो यांचा खरा चेहरा आहे तो जनते समोर आणत राहू, असं आदित्य ठाकरे सत्ताधारी पक्षनेत्यांना खडसावून सांगितलं आहे.पुढे असंही म्हणाले की, सत्ताधाऱ्यांच्या मनात असेल की, पर्यटन खातं घेऊन जगभर फिरायचारी वारी करायची, हा गैरसमज असेल तर त्यांनी तो दूर करावा.

पाहणं ठरणार महत्वाचं –

दरम्यान, सत्ताधारी पक्षनेत्यांनी शिवसेना पक्षालाही लक्ष्य करत ‘खड्ड्यांचे खोके, मोतोश्री ओके’ अशी घोषणाबाजी केली होती. यावर शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात,हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!