🕒 1 min read
Aditya Thackeray। नाशिक : काल भिवंडीत बोलताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे बोलताना लाज असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा, असं आव्हान देतानाच हे सरकार जास्त काळ चालणार नाही. दोन लोकांचं मंत्रिमंडळ आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे लिहून घ्या, असं म्हणाले होते. या टीकेला शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी प्रत्युत्तर होत. माझे आदित्य ठाकरेंना जाहीर आव्हान आहे. माझ्या काही प्रश्नांची उत्तरे आदित्य यांनी नांदगाव विधानसभेच्या मतदारांसमोर द्यावीत. तसेच त्यांनी जर माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली तर मी ताबडतोब त्याच मिनिटाला राजीनामा देतो. मी परत निवडणूक लढवतो, असं आव्हान सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे.
सुहास कांदे यांचं आव्हान आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलं आहे. मी त्यांना निश्चित भेटेन. ते मातोश्रीवरही भेटायला आले तरी चालेल, दरवाजे उघडेच आहेत. मी काळाराम मंदिरात नेहमीच येतो. आताही दर्शनासाठी आलो. आता आपण मंदिरात आहोत. त्यामुळे इथे राजकारण नको, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. आज दुपारी आदित्य ठाकरे मनमाड येथे शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्यात ते सुहास कांदे यांच्या आरोपांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सुहास कांदे माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, आदित्य ठाकरे आणि ठाकरे घराण्याबद्दलही आदर आहे. पण माझे आदित्य ठाकरेंना जाहीर आव्हान आहे. माझ्या काही प्रश्नांची उत्तरे आदित्य यांनी नांदगाव विधानसभेच्या मतदारांसमोर द्यावीत. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पर्यटन खात्याचा निधी का दिला नाही? पर्यटन खात्याचा एक प्रकल्प नांदगावमध्ये दाखवा. तसेच त्यांनी जर माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली तर मी ताबडतोब त्याच मिनिटाला राजीनामा देतो. मी परत निवडणूक लढवतो, असं ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Suhas Kande : आदित्य ठाकरेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली तर मी ताबडतोब राजीनामा देतो; सुहास कांदे यांचे आव्हान
- VVS Laxman : प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची बेंच स्ट्रेंथ वाढवण्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणने सुचवली भन्नाट कल्पना
- Sudhir Mungantiwar | “तुमच्या बापाचा माल आहे का?” ; पूरपरिस्थितीची पाहणी करताना सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांवर संतापले
- Sanjay Raut : द्रौपदी मुर्मू यांच्या विजयात शिवसेनेचा खारीचा वाटा – संजय राऊत
- Suhas Kande : हिंदुत्वासाठी लढलो ही चूक झाली का?; सुहास कांदे आदित्य ठाकरेंना भेटून जाब विचारणार

