Share

पंकजा मुंडेंचे वर्चस्व असलेल्या बीड जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आदित्य सारडा बडतर्फ

Published On: 

🕒 1 min read

बीड : जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचा पराभव, भाजपची पीछेहाट आणि राज्यात सर्वाधिक जागा मिळवूनही सत्तेपासून दूर झालेल्या भाजपच्या जिल्ह्यातील बुरुजांना तडे जाऊ लागले आहेत. पंकजा मुंडेंचे वर्चस्व असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आदित्य सारडा आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. देशमुख यांना बडतर्फ करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधकांनी दिले आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी शासनाने जिल्हा नियोजन समितीवरील विशेष निमंत्रित आणि नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्याने भाजपच्या अनेक बड्या नेत्यांची गच्छंती झाली आहे. जिल्हा बॅंकेने शेतकरी सन्मान योजनेत अनियमिता केल्याचा ठपका ठेवत सारडा यांच्यावर ही कारवाई केली.

अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत 2011 मध्ये आर्थिक अनियमिततेचे प्रकार समोर आले. तत्कालीन संचालक मंडळाने राजीनामे दिल्याने काही वर्षे बॅंकेवर प्रशासक होता. त्यानंतर 2015 मध्ये निवडणूक होऊन पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित आघाडीने बाजी मारली. आदित्य सारडा यांना अध्यक्षपद देण्यात आले. दरम्यान, 2017 मध्ये महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना या नावाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली.

यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान पंधरा अन् जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले होते. बीड जिल्हा बॅंकेत तब्बल अठरा हजार शेतकऱ्यांना 24 कोटी 65 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. बॅंकेने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर न जमा करता ही रक्कम ठेवीदारांना दिल्याचा ठपका ठेवण्यात आला. प्रकरणी लातूर येथील विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांच्याकडे 14 महिने झालेल्या सुनावणीनंतर बॅंकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांना अध्यक्षपदावरून आणि संचालक पदावरून पदच्युत करण्यात आले आहे. तसेच बॅंकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. देशमुख यांनाही नोकरीतून काढण्याचे आदेश देण्यात आले. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, तत्कालीन ग्रामविकासमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित आणि नामनिर्देशित म्हणून घेतलेल्या सदस्यांवरही संक्रांत आली आहे. शासनाने या सदस्यांचे पद रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रमेशराव आडसकर, अशोक लोढा, स्वरूपसिंह हजारी, अमोल तरटे यांचे डीपीसीचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1209070619507036162?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209070619507036162?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!