🕒 1 min read
मुंबई : शिवसेना पक्षाच्या (Shivsena) इतिहासात पहिल्यांदाच दोन ठिकाणी दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) सभा झाली तर बीकेसीवर एकनाथ शिंदे यांची. यावेळी दोन्ही पक्षाने एकमेकांवर हल्लाबोल केला. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
नितेश राणे यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात :
दुसऱ्यांची मुलं कार्टी..लहान नातवंडांना पण नावं ठेवणार, यांचा penguin कार्टा..nightlife च्या नावाने सगळी कडे Ranjeet बनून फिरतो तेच काय.. मग Disha Salian बद्दल पण बोला, 8 June च्या पार्टी मधे आणलेली लहान मुलं पण कुणाची नातवंड होती?? तेही तुमच्या आदित्य कार्ट्या ला विचारा जरा.., असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.
नितेश राणे यांचं ट्विट :
दुसऱ्यांची मुलं कार्टी..लहान नातवंडांना पण नावं ठेवणार..
यांचा penguin कार्टा..nightlife च्या नावाने सगळी कडे Ranjeet बनून फिरतो तेच काय..
मग Disha Salian बद्दल पण बोला
8 June च्या पार्टी मधे आणलेली लहान मुलं पण कुणाची नातवंड होती??
तेही तुमच्या आदित्य कार्ट्या ला विचारा जरा..— Nitesh Rane (@NiteshNRane) October 6, 2022
राहुल शेवाळे यांनी देखील साधला निशाणा :
काल झालेल्या मेळाव्यामध्ये राहुल शेवाळेंनी देखील आदित्य ठाकरेंवर घणाघात केला होता. बाबा रुग्णालयात असताना पक्ष फोडला, जाण्याचे कारस्थान रचले जात होते, असा आरोप आदित्य ठाकरेंनी आमच्यावर केले होते, असं शेवाळे म्हणाले. तसेच जेव्हा उद्धव ठाकरे रुग्णालयात होते, तेव्हा टीका करणारे स्वत: (आदित्य ठाकरे) स्विझर्लंड येथे व्यापारी परिषदेला गेले होते. त्यांचा विभाग नसताना ते गेले होते. जेव्हा जून महिना यायचा तेव्हा ठाकरे इंग्लंडला जायचे. आम्ही इथे नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत असायचो, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.
मला स्वप्नातही वाटलं नाही की, मी राहुल रमेश शेवाळे याला या व्यासपीठावर भाषण करण्याची संधी मिळेल. मी राहुल रमेश शेवाळे या नावाचा वापर वारंवार करत आहे, कारण मी कुणाचा बाप चोरलेला नाही. माझं नाव राहुल रमेश शेवाळे आहे. माझे वडील रमेश संभाजी शेवाळे हे होते, हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. कारण वारंवार आमच्यावर आरोप होतो की माझा बाप चोरला, असं शेवाळे म्हणाले.
दरम्यान, शेवाळे यांनी महाभारताचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांचं समर्थन केलं आहे. यावेळी त्यांची भगवदगीतेचा देखील उल्लेख केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- BJP | ‘बापाच्या नावाने थापा’; ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचा पलटवार
- New Smartphone Launch | Motorola चा ‘हा’ नवीन स्मार्टफोन होणार 7 ऑक्टोबरला लाँच
- Eknath Shinde | “एकनाथ शिंदे मान खाली करुन भाजप…”, शिवसेनेचा हल्लाबोल
- Eknath Shinde | “आनंद दिघेंचा मृत्यू झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी विचारलं…”, एकनाथ शिंदेंचा आरोप
- Ravi Rana । “उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे फुसका बार”; रवी राणांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
