🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या सणासुदीची धूम सुरू आहे. त्यामुळे बाजारात खरेदी विक्रीचा जोर वाढला आहे. या परिस्थितीचा फायदा घेत प्रत्येक कंपनी आपले नवनवीन मॉडेल्स मार्केट मधील लाँच करत आहे. याच संधीचा फायदा घेत Motorola देखील उद्या म्हणजेच 7 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात आपला नवा स्मार्टफोन लॉंच करणार आहे. Motorola आपला Moto E32 भारतात लाँच करणार आहे. लाँच पूर्वीच कंपनीने या स्मार्टफोनच्या किमती आणि फिचर्स बद्दल माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया त्याबद्दल:
Moto E32 फिचर्स
Motorola आपल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक विशेष फीचर्स घेऊन येत आहे. यामध्ये 90Hz रेटसह 6.5inch HD+LCD डिस्प्ले आहे. त्याबरोबर MediaTek Helio G37 प्रोसेसरसह हा फोन सुसज्ज आहे. या स्मार्टफोनचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे याचे इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा स्मार्टफोन 2 वर्षाच्या OS अपग्रेट सोबतच सेक्युरिटी पॅच सोबत येण्याची शक्यता आहे.
Moto E32 किंमत
Motorola चा Moto E32 भारतात लाँच होण्यापूर्वी युरोपमध्ये लाँच झाला आहे. युरोपमध्ये या स्मार्टफोनची किंमत 149 युरो ( 12,000) रुपये एवढी आहे. आणि भारतात ही या फोनची किंमत 12,000 रू. पासूनच सुरु होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. Motorola चा हा नवीन स्मार्टफोन 12 ऑक्टोबर पासून Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Moto E32 कॅमेरा
Moto E32 उत्तम कॅमेरासह लाँच साठी सुसज्ज आहे. यामध्ये 50MP रिअल कॅमेरा आणि 2MP सेकंडरी सेंसर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा उपलब्ध असेल. या स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 5,000mAh बॅटरी असून ती 10W चार्जिंगला सपोर्ट करते.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | “आनंद दिघेंचा मृत्यू झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी विचारलं…”, एकनाथ शिंदेंचा आरोप
- Ravi Rana । “उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे फुसका बार”; रवी राणांचा हल्लाबोल
- Jaidev Thackeray | सर्व बरखास्त करा, पुन्हा निवडणूक घ्या, राज्यात शिंदे राज्य येऊ द्या; जयदेव ठाकरेंचे शिंदेंच्या मंचावरून आवाहन
- Eknath Shinde | “आम्ही गद्दारी केली नाही, तर…”; एकनाथ शिंदेंचं शिवसेनेला प्रत्युत्तर
- Eknath Shinde । मुख्यमंत्रीपद घेताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती; एकनाथ शिंदे यांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
