Share

BJP | ‘बापाच्या नावाने थापा’; ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचा पलटवार

Published On: 

मुंबई : ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. मेळाव्यादरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नाही. ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच निशाणा साधलेला पाहायला मिळाला. आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का?,असा खोचक सवालही शिंदे यांनी ठाकरेंना केला. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याला भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

हा सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट असल्याचा टोला भातखळकर यांनी ठाकरेंना लगावला आहे. “बापाच्या नावाने थापा. अरे हाच खरा थापा आहे.. पण त्या आधी वाफा आहेत.” अशा आशयाचं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भाषणातून आव्हान दिलं होतं. पाकव्याप्त काश्मीरमधील भारताची जागा घेऊन दाखवा असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावरही भातखळकरांनी ठाकरेंवर टीका केली.

“आठ वर्षात POK ची एकही फूट जमीन घेतली नाही… जनाब ठाकरे उध्दव ठाकरे, अहो ते टक्केवारी घेण्या इतकं सोपं आहे का? ज्यांच्यामुळे देश खंडित झाला पाकिस्तानची निर्मिती झाली, POK अस्तित्वात आला. त्या काँग्रेसचे जोडे उचलताना त्यांनाही विचारा कधी तरी हा प्रश्न.” असा शाब्दिक हल्लाबोल भातखळकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

काय म्हणालेत उद्धव ठाकरे?

शिवाजी पार्क मैदानावर होत असलेल्या, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या बापाच्या नावावर मतं मागायला काय होतंय? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. यांची बाप चोरणारी औलाद असल्याची जहरी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. कोंबडीचोरावर, बाप चोरांवर या मेळाव्यावर जास्त बोलायचं नाही. या व्यासपीठाला एक अर्थ आहे, पावित्र्य आहे. ही सगळी लोकं आपल्यासाठी आले आहेत. शिव्या देणं खूप सोपं असतं, पण विचार देणं फार कठीण असतं. मी ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!