परभणी : वर्षानूवर्षापासून दक्षिण मध्यरेल्वे विभागात पूर्णतः दूर्लक्षित ठरलेल्या नांदेड विभागास तातडीने मध्य रेल्वे विभागास जोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी बुधवारी राज्यसभेत केली.
दक्षिण मध्य रेल्वे विभागातील नांदेड विभागावर सातत्याने अन्यायच होत आला आहे. सर्वाधिक उत्पन्न देऊन देखील या विभागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने दक्षिण मध्यरेल्वे विभागामाव्दारे कमी आर्थिक तरतुद होताना दिसते. त्याचा परिणाम नांदेड विभाग रेल्वे विकासाच्या कामापासून कोसोदूर राहिल्याची खंत खान यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली. काचीगुडा – मनमाड या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण तसेच विद्युतीकरणाच्या कामाची केंद्र सरकार दखल घेत नाही. मराठवाड्यातून मुंबईकडे धावणार्या रेल्वेसुध्दा खुपच अपुऱ्या आहेत.
सर्वसामान्य नागरिक तसेच प्रवाश्यांकरिता पॅसेंजर गाड्याही नाहीत, असेही या वेळी खान यांनी सांगितले. तर जनशताब्दी एक्स्प्रेस जालनाहून नांदेडपर्यंत आणावी, अशी मागणी केली. तसेच रेल्वे बोर्डाने रेल्वेचे खासगीकरण करण्याचे सुरू केलेले प्रयत्न तातडीने थांबवावेत, अशीही मागणी खान यांनी राज्यसभेत केली आहे. जनशताब्दी एक्सप्रेस जर नांदेडहून सोडली तर खुप मोठ्या पल्ल्याची गाडी संपुर्ण मराठवाड्याला जोडल्या जाइल आणि त्यामुळे मुंबईकडे जाण्यासाठी सोपी, सुलभ आणि जलद गाडी मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, परळी (बीड) नांदेड या जिल्हाला याचा फायदा देखील होणार असल्याची मागणी देखील खासदार खान यांनी या वेळी राज्यसभेमध्ये केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून उर्मिला मातोंडकरांनी खास ट्विट करून आदित्य ठाकरेंचं केलं अभिनंदन
- ‘वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन,’त्या’ व्यक्तीने दिले होते राम मंदिरासाठी १५ कोटी’
- महावितरणच्या मदतीला बळीराजा आला धावून
- राज्यात कोरोनाचे थैमान लवकरच लागणार कडक निर्बंध, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
- शिवसेनेच्या बाणाने भाजप घायाळ, जळगावात सत्ता हिसकावली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
