🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्ड अण्ड ब्यूटीमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. तिचा फॅशनचा सेन्स सगळयांनाचा आवडतो. मात्र सोशल मीडियावरील काही फोटोमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
सोनम कपूरने नुकताच एक विचित्र पोषाख परिधान केला आहे. या नव्या लूकमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून ट्रोल झाली आहे. तिने घातलेल्या ड्रेसवर स्त्रीच्या शरीराचे चित्र रेखाटलेले आहे. यामधून स्त्री आणि पुरूष समानतेचा संदेश दिला जात असल्याचे दिसते आहे. तिने या ड्रेसवर अगदी साधा मेकअप केला असून त्यावर लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे. तसेच केस साध्या पध्दतीने बांधले आहेत. मोठे कानातले घातलेले असून हा लूक चर्चेचा विषय ठरतो आहे.
https://www.instagram.com/p/CUkBQr3KzII/?utm_medium=copy_link
सोनमने तिचा मित्र आएशा भारती याच्या एका प्रोजेक्टचा आनंद साजरा करण्यासाठी तिला आमंत्रित केल्याचं सांगीतले. मात्र या लूकवर नेटकऱ्यांनी तिच्या भरपूर टिका केल्या आहेत. तर काही चाहत्यांनी वाहवाही ही केली आहे. त्यामुळे तिला ट्रेंड मेकर देखील बोललं जातं. सध्या ती पती आनंद आहुजासोबत लंडनला राहत आहे. तसेच आगामी काळात ‘ब्लाइंड’ या चित्रपटाच्या माध्यमाने पुन्हा झळकणार असल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या तर 5 पण जागा आल्या नसत्या; चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला डिवचलं
- सुभाष साबणे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने शिवसेनेत अस्वस्थता?
- ‘उत्तर प्रदेशात तर जनरल डायरचे सरकार आहे’, बाळासाहेब थोरातांचा संताप
- ‘लक्ष्मीसाठी दार उघडा, खोट्या शपथा घ्या, पैसे घ्या, पण मतदान साबणेंना करा’, सदाभाऊंचे अजब आवाहन
- ‘..तर मी माझी मालमत्ता गिरीश महाजन यांना दान देईल’, एकनाथ खडसेंचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
