Share

“छत्रपतींच्या वंशजाच्या पाठीत खंजीर खुपसायचा ही…” ; मनसेचे शिवसेनेवर टीकास्त्र

Published On: 

मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांना अगोदर शिवसेना प्रवेश तरच राज्यसभेची संधी अशी ऑफर देण्यात आली होती, मात्र संभाजीराजे यांनी ही ऑफर नाकारली आहे. आता राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावरूनच भाजप तसेच संभाजी राजेंच्या समर्थकांकडून टीका केली जात आह. मनसेने देखील शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

मनसे प्रवक्ते गजानन काळे म्हणाले, “संभाजीराजेंना मनसे आणि मनसे आमदार राजूदादा पाटील यांनी पाठिंबा दिला. राजेंचा मान सन्मान कसा ठेवायचा हे आम्हास ठाऊक आहे. बाकी नाव छत्रपतींचे घ्यायचे आणि छत्रपतींच्या वंशजाच्या पाठीत खंजीर खुपसायचा ही शिवसेना आणि महाविकास आघाडीची निती आहे. मराठा समाजाने आता तरी या कावेबाजांचा डाव ओळखावा.”

मनसे आमदार राजू पाटील म्हणाले, “राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलेच पाहिजे का? सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे”

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे. छत्रपतींच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊत विरोध करत आहेत. प्रियंका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना कुठल्याही अटी-शर्थी न ठेवता राज्यसभेवर पाठवता आणि दुसरीकडे छत्रपतींच्या नावावरती एवढं वर्ष राजकारण करत आहेत, सत्ता भोगत आहेत. या शिवसेनेचा ‘शिव’च आमच्या छत्रपतींचा आहे. असे अंकुश कदम यांनी म्हटले आहे.

तसेच संजय राऊत तुमचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. २०२४ मध्ये तुम्हाला याची राजकीय किंमत मोजावी लागेल. छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढवणार. असा इशाराही अंकुश कदम यांनी दिला आहे. दरम्यान गेल्या १५ दिवसांमधील घडामोडी समजून घ्या. छत्रपतींचा, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा आम्ही संभाजीराजेंना द्यायला तयार झालो. यापेक्षा शिवसेना अजून काय करू शकते हे सांगावं. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!