🕒 1 min read
मुंबई : सध्या लॉकडाऊनच्या काळात सायबर अकाउंट हॅकिंगबाबत एक नवीन प्रकारचा गुन्हा करण्यास सुरवात केली आहे. काही जगप्रसिद्ध व्यक्तींचे अकाउंट्स हॅक केली गेली आहेत. यातच आता बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल इंस्टग्राम अकाऊंट सोमवारी हॅक झालं.
यापूर्वी अभिनेत्री अमीषा पटेल आणि चित्रपट दिग्दर्शक फराह खान हिचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले होते. ईशा देओलने रविवारी ट्विटरवरून आपले इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे.
ईशा देओलने आपल्या चाहत्यांना आवाहन केलं आहे की, तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून येणाऱ्या कोणत्याही मेसेजला प्रतिसाद देऊ नका. ईशाने हे सांगतानाच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटचा फोटोही शेअर केला आहे.
ईशाने याबाबत माहिती देताना लिहिलं आहे की, ‘आज सकाळी माझे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. कृपया या अकाऊंटवरून काही संदेश मिळाल्यास प्रतिसाद देऊ नका. या सर्व प्रकारामुळे आपली गैरसोय झाल्याबद्दल मी माफी मागते. माझा इंस्टाग्राम आयडी imeshadeol आहे.’
This morning my official Instagram account imeshadeol got Hacked , so please don’t reply to any msg if you received any from my Instagram account. Sorry for the inconvenience.
Insta Id : imeshadeol pic.twitter.com/AbLg79WxIY— Esha Deol (@Esha_Deol) January 10, 2021
इन्स्टाग्राम हे सोशल नेटवर्किंगचं एक लोकप्रिय माध्यम आहे. आता इन्स्टाग्रामबाबत महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं एक अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं सांगितलंय तुमच्या इन्स्टा अकाउंटचं युजरनेम आणि पासवर्ड अजिबात कुणाशी शेअर करू नका. याबाबत तुम्हाला कथित कॉपीराईटचा भंग होत असल्याचे एसएमएस किंवा ईमेल्स येतील. मात्र त्यांना बळी पडू नका. हॅक करणारे गुन्हेगार या माहितीचा उपयोग व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी करत असल्याचे सायबर सेल पोलिसांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्य
- टीम इंडिया कारणं शोधत आहे; ऑस्ट्रेलिया कॅप्टनची टीका
- ‘क्रिकेट आपल्याला भेदभाव शिकवत नाही’; वर्णद्वेषी टीका प्रकरणावर तेंडूलकरने व्यक्त केली नाराजी
- औरंगाबादेत 7 आरोग्य केंद्रांत लसीकरण, 2 केंद्रांत पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
- औरंगाबादेत आणखी 20 बसेस धावणार, विद्यार्थ्यांना पासची सुविधा
- …तर ओबीसी आरक्षणातच मराठा समाजाचा समावेश करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
