मुंबई: गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. अनेक लोक बेरोजगार झाले. यामुळे अनेक लोकांवर आर्थिक संकट निर्माण झाले. यातूनच अनेकानी पैसे कमविण्याचे वेगवेगळे मार्ग निवडले. यामुळे काही लोक चुकीचा निर्णय घेतात.यामुळे संपूर्ण आयुष्य बिघडून जाते. याबाबत ‘जॉबलेस’ या वेब सीरिजमधून काही मुद्दे मांडण्यात आले आहे.
‘जॉबलेस’ या वेब सीरिजमध्ये अभिनेता सुव्रत जोशी, पुष्कर क्षोत्री प्रेक्षकाना पाहायला मिळणार आहे. तर निरंजन पत्की यांनी सीरिजचं दिग्दर्शक केलं आहे. या वेब सीरिजमधून अनेक प्रश्न उलगडणार आहेत.
https://www.instagram.com/tv/CSdhctjCqzu/?utm_source=ig_web_copy_link
‘जॉबलेस’ बद्दल अक्षय बर्दापूरकर सांगतात की, ‘सद्यस्थितीवर आधारित ही वेबसीरिज आहे. कोरोनामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. नोकरी गेल्याने अनेक जण तणावपूर्ण जीवन जगत आहेत आणि त्यातूनच मग चुकीचे पाऊल उचलले जाते.’
पुढे ते म्हणाले, ‘एक चूक सावरताना हातून अनेक चुका होतात आणि संपूर्ण आयुष्य बदलून जाते. या कठीण परिस्थितीवर भाष्य करणारी ही सीरिज आहे. यातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी बोध मिळेल. ३१ ऑगस्टपासून अतिशय अल्प दरात सीरिज पाहता येणार आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांविरोधात आमच्याकडे पुरावे, त्यांना दोषमुक्तता नको’, एसीबीचा कोर्टात दावा
- भाजप नेते प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा, राजकीय चर्चांना उधाण
- संसदीय मर्यादाभंग! खासदार बेफाम का होतात, याची कारणे अष्टप्रधानांनी शोधावी- संजय राऊत
- मुंबई महापालिकेचा गणेशोत्सव मंडळांना दिलासा !
- इंग्लंडचा कर्णधार जो रुटने गाठला मैलाचा टप्पा, द वॉल द्रविडला टाकले मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

