मुंबई : दाक्षिणात्य अभिनेते आणि नेते कमल हासन (Kamal Haasan) यांना करोनाची लागण झाली आहे. काही दिवत्यांना किरकोळ सर्दी तसेच करोनाची काही लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी कोव्हिड चाचणी करताच ती पॉझिटिव्ह आली आहे. सध्या ते आयसोलेशनमध्ये असून सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली आहे.
दरम्यान सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबद्दल जनजागृती झाली आणि त्यास चांगला प्रतिसाद ही मिळाला आहे. मात्र कमल हासन यांनी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली आहे. त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतल्याची माहिती दिली आहे. ‘मी अमेरिकेला जाऊन आल्यानंतर मला कफाचा थोडा त्रास होऊ लागला. मी करोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. पण मला जाणवले आहे की करोना अजून गेलेला नाही आणि माझी सर्वांना विनंती आहे की काळजी घ्या’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.
அமெரிக்கப் பயணம் முடிந்து திரும்பிய பின் லேசான இருமல் இருந்தது. பரிசோதனை செய்ததில் கோவிட் தொற்று உறுதியானது. மருத்துவமனையில் தனிமைப்படுத்திக் கொண்டுள்ளேன். இன்னமும் நோய்ப்பரவல் நீங்கவில்லையென்பதை உணர்ந்து அனைவரும் பாதுகாப்பாக இருங்கள்.
— Kamal Haasan (@ikamalhaasan) November 22, 2021
देशात एकीकडे कोरोना कमी झाल्याची चर्चा सुरू असतांना अभिनेता कमल हासन यांच्या या पोस्टमुळे पुन्हा सतर्क राहण्याबद्दल इशारा देण्यात येत आहे. लोकांना करोनापासून वाचवण्यासाठी भारत सरकार सातत्याने करोना लसीकरण मोहीम राबवत असून, त्याअंतर्गत आतापर्यंत १,१६, ५०, ५५, २१० लसी देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मात्र सोशल मीडियावर हासन यांची ही पोस्ट पाहून अनेकांनी त्यांना ‘गेट वेल सून’, काळजी घ्या..,असे कमेंटस् पहायला मिळत आहे. कमल हासन यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिवतीर्थ’वर सचिन तेंडुलकरने घेतली राज ठाकरेंची भेट
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
- मी तर एक छोटे प्यादे आहे, मोठे खेळाडू तर….; सचिन वाझेचे खळबळजनक वक्तव्य
- …म्हणून परमबीर सिंग लपून बसले आहेत; वकिलांचा न्यायालयात युक्तीवाद
- …म्हणून देशाने गेल्या ७५ वर्षांत हवी तेवढी प्रगती केली नाही- मोहन भागवत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

