Share

‘हा मानवतेचा घोर अपराध आहे’ म्हणत अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केला निषेध

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा टीम : पालघरमध्ये मॉब लिंचिंगची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पालघरमधील गडचिंचले गावात घडली आहे. त्यानंतर दोन दिवसांनी त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. या प्रकरणावर सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सुद्धा ट्विट करत घटनेचा निषेध व्यक्त केला. ‘पालघरमध्ये तीन साधूंच्या हत्येची घटना अत्यंत भयानक व दु:खद आहे. त्या घटनेचा व्हिडीओ मी शेवटपर्यंत पाहू शकत नाही. हे काय होतंय? देशात काय घडतंय? हा मानवतेचा घोर अपराध आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरद्वारे दिली.

अभिनेता फरहान अख्तरनेही या घटनेचा निषेध करत, देशात झुंडशाहीला थारा नाही दिला गेला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. दरम्यान या घटनेची नैतिक जवाबदारी स्विकारुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!