Share

दरेकर साहब को घुस्सा क्यु आता है?; अजितदादांच्या प्रश्नाला दरेकरांनी दिले उत्तर म्हणाले… 

Published On: 

मुंबई: विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. मात्र सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वेगवेगळ्या कारणांनी टोलवाटोलवी पहावयास मिळते. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar ) यांच्यावर निशाणा साधत दरेकर साहब को घुस्सा क्यु आता है? असे म्हटले. यामागे तुमची काही कारणे असू शकतात असेही त्यांनी म्हटले. यावरच दरेकर यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

दादा म्हणाले दरेकर को घुस्सा क्यु आता है? सहकाराच्या प्रांगणात राजकारणाचे जोडे बाजुला काढून ठेवावे लागतात. मात्र, सध्या सहकारमध्ये राजकारण सुरु आहे. सहकार संस्थांवर कारवाईपेक्षा उपाययोजना महत्वाच्या आहेत. जरंडेश्वर साखर कारखाना सभासदांचा होता, तो खासगीत काढला आणि चांगला चालतो. 70 ते 80 टक्के कारखाने खासगी झाले.साखर कारखान्यांना थकहमी दिली ते चांगलं झालं. पण काही विशीष्ट कारखान्यांनाच थकहमी देऊन उपयोग नाही. असे दरेकर यांनी म्हटले.

दरम्यान यावेळी मोबाईल टॉवर कंपन्यांना विद्युत शुल्क माफ करण्याचं काही कारण नसल्याची माहिती अजित पवार यांनी  दिली. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2 हजार कोटी रुपयांचे विद्युत शुल्क माफ केल्याचा आरोप केला होता. यावर अजित पवार यांनी उत्तर दिले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!