Share

#अजय_देवगन_कायर_है हा हॅशटॅग सध्या ट्वीटरवर ट्रेंड का होत आहे ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनला काही सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे तर काहींनी विरोध केला आहे. अभिनेता अजय देवगण यानं काही दिवसांपूर्वी त्यानं यासंदर्भात ट्विटही केलं होतं.

या प्रार्श्वभूमीवर काल मुंबईतील गोरेगाव इथं अजयची कार कृषी आंदोलक समर्थकानं अडवल्याचं समोर आलं आहे.अजय काही कामानिमित्त गोरेगाव, दिंडोशी इथं आला असताना एका व्यक्तीनं त्याची कार रोखलीआहे. गाडी रोखणारी व्यक्ती पंजाबी भाषेत अजयला आंदोलनाला आणि पंजाबला विरोध केल्याप्रकरणी जाब विचारताना दिसत आहे.

घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आणि पोलीसही पोहोचले आणि पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या राजदीप सिंग याला ताब्यात घेवून अभिनेता अजय देवगण याची गाडी गोरेगाव फिल्मसिटीपर्यंत सोडली.

तू शेतकरी आंदोलनावर गप्प का आहेस? आंदोलनला विरोध का केला असंही हा व्यक्ती म्हणताना दिसतोय. तब्बल १५ मिनिटे या व्यक्तीनं अजयची कार अडवली होती. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान, आता या तरुणाला जामिन मंजूर करण्यात आला आहे. मनजिंदर सिंह सिरसा यांनी सोशल मीडियाद्वारे जामिनाची माहिती दिली. या इसमाविरोधात कलम 341, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान,सर्व प्रकारामुळे अजय देवगणला सध्या सोशल मिडीयावर ट्रोल केले जात आहे. #अजय_देवगन_कायर_है हा हॅशटॅग सध्या ट्वीटरवर ट्रेंड होत असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!