Share

अनंत करमुसे प्रकरणात पोलिसांवर कारवाई झाली, आव्हाडांना अटक कधी होणार ?

Published On: 

🕒 1 min read

ठाणे- ठाण्यातील अनंत करमुसे या सिव्हिल इंजिनियरने आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या 15 ते 20 समर्थकांनी त्यांना जबर मारहाण केली होती. या प्रकरणी सहा महिने उलटल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी या मारहाण प्रकरणात सहभागी असलेल्या तिघा अंगरक्षक पोलिसांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार,घोडबंदर रोडवरील आनंदनगर भागात राहणारे करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर ५ एप्रिल रोजी रात्री करमुसे यांना पोलीस आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले आणि १५ ते २० जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता.

विशेष म्हणजे मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असा करमुसे यांच्या तक्रारीत उल्लेख आहे. दरम्यान,माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला थेट सवाल उपस्थित केले आहे. सोमय्या म्हणाले,ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:च्या १५ पोलीस अंगरक्षकांच्या माध्यमातून इंजिनिअर अनंत करमुसेचे अपहरण केले, त्यानंतर त्याला घरी आणले आणि मारहाण केली. ठाकरे सरकारने याप्रकरणी सहा महिन्यांनी तीन पोलिसांना अटक केली आहे. आतापर्यंत नऊ लोकांना अटक झाली. पण जितेंद्र आव्हाड यांना कधी अटक होणार? असं म्हटलं आहे.

ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाणप्रकरणात तिघा पोलिस शिपायांवर कारवाई झाली असली, तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का, असा सवाल भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी देखील केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!