पुणे – मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. पंजाबामध्ये काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली खेती बचाओ यात्रा सोमवारी संगरूर जिल्ह्यात पोहोचली.
भवानीगड येथे धान्यबाजारात झालेल्या सभेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कृषि विधेयकाकरून मोदी सरकारवर निशाणा साधला.मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात गरीब, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी एकही धोरण आणले नाही. ती सर्व धोरणे तीन ते चार निवडक मित्रांसाठी (उद्योगपती) बनवण्यात आली, असे त्यांनी म्हटले.
राहुल गांधी या यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारवर हल्ला चढवत आहेत तर काँग्रेसच्या या रॅलीवर भाजपकडून टीका होत आहे. आ.अतुल भातखळकर यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या ‘शेती वाचवा’ आंदोलनात फक्त ट्रॅक्टर, सभांमधून शेतकरी मात्र गायब!….खरा शेतकरी मोदी सरकारच्या नवीन शेती विषयक कायद्याचे फायदे पुरेपूर जाणतो… तो कशाला फिरकेल अशा बोगस आंदोलनाकडे?… काँग्रेस साठी खरा शेतकरी मात्र रॉबर्ट वाड्राच आहे…असं त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.
भातखळकर यांनी केलेल्या टीकेला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सेक्रेटरी स्नेहल डोके पाटील यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी भातखळकर यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. दोन-चार धनाढ्य व्यापाऱ्यांचं लांगुलचालन करणाऱ्यांनी खरा शेतकरी कोण हे जाणलं असतं, तर आज राहुल गांधींना ‘खेती बचाव’ आंदोलन करण्याची गरज पडली नसती.’अच्छे दिन’चं गाजर दाखवून सत्तेत आलेले आज हुकूमशाही पध्दतीने वागत आहेत व आम्ही त्यांच्या या जुलमी प्रवृत्तीचा निषेध करत राहू असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का?
- मलिन प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे : रावसाहेब दानवे
- पुणे : दोन लाख विद्यार्थी ऑनलाईन तर 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन अंतिम वर्षाची परीक्षा देणार
- भारतातील सक्रीय कोविड रुग्णांच्या प्रमाणात सातत्याने घट; जाणून घ्या महाराष्ट्राची काय आहे स्थिती ?
- … तोपर्यंत राज्यातील कॉलेजेस सुरु होणार नाहीत – उदय सामंत


