Share

गोरगरीब चालक व मालक यांच्याकडून बळजबरीने बँक हफ्ता वसुली करणाऱ्यांवर कारवाई करावी – खासदार इम्तियाज जलील

Published On: 

औरंगाबाद : कोरोना महामारी व संचारबंदीच्या काळात रिक्षा व इतर प्रवासी वाहनांचे थकीत बँक हफ्ते वसुली करण्यासाठी गोरगरीब मालक व चालक यांना नाहकत्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या खाजगी रिकव्हरी एजंटना त्वरीत पाबंद करण्यात यावे अशी तक्रार खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे चालक व मालक यांनी केली होती. त्याअनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांना पत्राव्दारे खाजगी बँक व फायनान्स कंपन्यांची बैठक घेवुन संबंधितांना पाबंद करण्याचे सुचित केले.

खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले की, कोरोना महामारी व संचारबंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक व वैद्यकीय सेवेशी निगडीत उद्योगांना परवानगी देण्यात आलेली आहे. इतर सर्व प्रकारचे कामधंदे, उद्योग व पर्यटन स्थळे बंद असल्याने रिक्षा व इतर प्रवासी वाहने चालविणाऱ्या गोरगरीब मालक व चालक यांच्यावर उपासमारीची वेळ येवुन आर्थिक परिस्थिती हलाखिची झालेली आहे.

अशा बिकट परिस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यातील खाजगी बँका व फायनान्स कंपन्यांनी बँकेचे हफ्ते वसुली करण्यासाठी बाउंन्सर, गुन्हेगारी पाश्र्वभुमी असलेले गुंड प्रवृत्तीच्या लोकांना गोरगरीब मालक व चालक यांच्याकडे सकाळी व मध्यरात्रीच्या वेळी पाठवत आहे. सदरील रिकव्हरी एजेंट गुंड प्रवृत्तीचे असल्याने ते वसुली करण्यासाठी बळजबरी करणे, दादागिरी करुन घरातील व्यक्तींना व महिलांना धमकावणे तसेच सर्रासपणे अर्वाच्च भाषेचा वापर करुन आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम करत असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमुद केले आहे. गोरगरीब चालक व मालक यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन औरंगाबाद जिल्ह्यातील खाजगी बँक व फायनान्स कंपन्यांची संयुक्त बैठक घेवुन नाहकत्रास देणाऱ्या सर्व संबंधितांविरुध्द उचित कायदेशिर कार्यवाही करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

कोरोनाच्या काळात रिक्षा, काळी पिवळी टॅक्सी व इतर प्रवासी वाहनांचे हफ्ते वसुली थांबली नाही तर सर्व गोरगरीब चालक व मालक हे त्यांचे जवळील वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणार आहे. वाहने जमा झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्व चालक व मालक यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहसाठी दररोज प्रत्येकी १००० रुपये द्यावे अन्यथा सर्वांसोबत  जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!