Share

Prithviraj Chavan | विरोधकांना मत देणाऱ्यांवर कारवाई करा- पृथ्वीराज चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय चांगलंच अस्थिर झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. सगळ्या पक्षातील  राजकीय नेते एकमेकांसोबत आरोप-प्रत्यारोपांचा खेळ खेळत आहेत. त्यातही कोण कोणावर आरोप करेल काही सांगता येत नाही.  अशातच काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मागणी केली आहे.

तुम्हाला आठवत असेल,  राज्यातील सत्ता बदलायच्याआधी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुका झाल्या होत्या. त्यामध्ये काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले. परंतू चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता, तर भारतीय जनता पक्षाच्या प्रसाद लाड विजयी यांचा विजय झाला होता. काँग्रेस पक्षाची मत फुटल्याचं या निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात आलं.

त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करत पक्षादेश धुडकावून विरोधकांना मत देणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. ही गंभीर घटना विधिमंडळ पक्षात घडली आहे. त्यामुळे पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांची नावंही समोर यायला हवी, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

तसेच, असा बेशिस्तपणे पक्ष चालणार असेल तर एखाद्या महत्वाच्या वेळी काही सदस्य पक्षाला अडचणीत आणतील, अशी चिंताही व्यक्त पृथ्वीराज चव्हाण यांनी केली असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!