औरंगाबाद : रेल्वे स्थानकावर किंवा धावत्या रेल्वेत साखळी ओढून रेल्वे थांबवू नका तसेच विनापरवानगी खाद्यपदार्थ विक्री करू नका. अशा सूचना वारंवार देऊन काहीजण या सुचनाकडे पाठ फिरवित आहेत. अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी आरपीएफच्या वतीने बुधवारी (दि.१२) सकाळपासून कारवाईचा बडगा उचलला जात आहे. यामध्ये दुपारपर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच जणांवर कारवाई केली असल्याची माहिती आरपीएफचे निरीक्षक अरविंद शर्मा यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकावर नो पार्किंगमध्ये रिक्षा उभ्या करू नका. रेल्वे विभागाच्या वतीने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही तर कारवाई करू अशा सूचना वारंवार देण्यात येतात. परंतु तरीही काहीजण याकडे दुर्लक्ष करत आहे. अशा लोकांवर आरपीएफच्या वतीने कारवाई केली जाते. आतापर्यंत अनेकांवर कारवाई करूनही काहीजण पुन्हा नियम पाळत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बुधवारी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.
त्यात विनापरवानगी खाद्यपदार्थ विक्री करणारे दोन जण आढळून आले. तर जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये साखळी ओढताना एकजण आढळून आला. त्यांना आरपीएफने ताब्यात घेतले आहे. याशिवाय रेल्वे स्थानक परिसरात नो पार्किंग मध्ये दोन रिक्षा आढळून आल्या त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उचलला असून रिक्षा देखील ताब्यात घेतल्या आहेत.
ही कारवाई दिवसभर करण्यात आली. याशिवाय वारंवार सूचना देऊनही रेल्वे विभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नसेल तर अशा लोकांवर कारवाई केली जाईल. तसेच काहीजण रेल्वे पटरीवर बाईक आणतात, विनाकारण फिरतात अशा लोकांवर देखील कारवाई केली जाईल असेही आरपीएफच्या वतीने स्पष्ट केले. त्यामुळे रेल्वे विभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करा असे आवाहन करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘स्पष्ट बोलता न आल्याने मित्र चिडवाचे’; शरद केळकरने सांगितला अनुभव
- ‘विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याइतपत राज्य सरकार बेपर्वा झालेय’, भाजपची टीका
- ‘विरोधकांनी देशाची माफी मागावी’, केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद
- तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’ ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता
- ‘…याची उत्तरे द्या अन्यथा राजीनामा द्या’, पडळकरांचे मंत्री वड्डेटीवारांना पत्र


