🕒 1 min read
मुंबई : दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह हे वयाच्या ७१व्या वर्षी देखील अनेक उत्तमोत्तम भूमिका सादर करत दिसतात. या वयातही ते व्यावसायिक आघाडीवर सक्रिय आहेत. परंतु, नेहमी फिट दिसणारे नसीरुद्दीन शाह सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत आहेत. त्यांनी स्वतः या आजाराबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की ते ‘ओनोमेटोमॅनिया’ नावाच्या वैद्यकीय समस्येने ग्रस्त आहे.
एका यूट्यूब चॅनलशी संवाद साधताना नसीरुद्दीन म्हणाले- ‘मला ओनोमेटोमॅनिया नावाच्या आजाराने ग्रासले आहे. मी विनोद करत नाही.” नसीरुद्दीन म्हणाले की, हा आजार मला शांततेत जगू देत नाही.
‘ओनोमॅटोमॅनिया हा असा आजार आहे ज्यामध्ये तुम्ही कोणतेही कारण नसताना एखादा शब्द, वाक्प्रचार, वाक्य, कविता किंवा भाषण पुन्हा पुन्हा सांगत राहता. माझ्यासोबत हे प्रत्येक क्षणी घडते, त्यामुळे मी कधीही शांततेत जगू शकत नाही. मी झोपेत असतानाही मला आवडणारे काही उतारे बडबडत राहतो.’
यावेळी त्यांनी त्यांच्या आणि पत्नी रत्ना पाठक यांच्या पुस्तकांच्या आवडीचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की दोघेही एकमेकांना अनेक पुस्तकांबद्दल सांगतात पण ते क्वचितच ती पुस्तके निवडतात. पण ‘टिन टिन कॉमिक’ हे दोघांचेही आवडते आहे. नसीरुद्दीन यांनी हेही सांगितले की त्यांनीच रत्ना पाठक यांना क्रिकेटची ओळख करून दिली.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
