Share

ओडिशाचा धुव्वा उडवत मुंबईची तीन हंगामानंतर उपांत्यपूर्व फेरीत धडक

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : शम्स मुलानीच्या फिरकीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ओडिशाचा एक डाव आणि १०८ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह मुंबईने ड गटात सर्वाधिक १६ गुणांसह अग्रस्थान गाठले आहे. त्यांनी तीन हंगामांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मुलानीने या सामन्यात ६४ धावत ५ विकेट्स घेतल्या.

मुंबईच्या पहिल्या डावातील २४८ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ओडिशाने ५ बाद ८४ धावांवरून चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. परंतु मुलानी आणि तनुष कोटियान या फिरकी जोडीने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना हैराण केले. त्यामुळे १४० धावांवर ओडिशाचा संघ गारद झाला. मुंबईने एका डावाने विजय मिळवल्यामुळे त्यांना बोनस गुण मिळाले. पहिल्या डावात १६५ धावांची खेळी साकारणारा सर्फराज खान सामनावीरचा मानकरी ठरला.

मुंबईसह पंजाब, कर्नाटक, बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या संघांनीही आगेकूच केली आहे. तर झारखंड आणि नागालँड यांच्यात उपउपांत्यपूर्व लढत १२ मार्चपासून होईल. त्यानंतर जूनमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होणार आहेत.

धावफलक :

ओडिशा – पहिला डाव : २८४

मुंबई – पहिला डाव : ९ बाद ५३२ – डाव घोषित

ओडिशा – दुसरा डाव : १४०

सामनावीर : सर्फराज खान

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!