🕒 1 min read
मुंबई : आज विधानसभेत बीडमधील जिल्ह्याधिकारी कार्यालयात गोळीबार प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. फडणवीस तावातावाने बोलत असताना मागे बसलेले भाजपचे नेते गिरीश महाजन चक्क डुलकी मारत होते. महाजनांना शेजारी बसलेल्या आशिष शेलारांनी हाताच्या कोपऱ्याने जागे केले. व महाजन जागे झाले. आता महाजन डुलकी मारत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आणि याला नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
विधानसभेत देवेंद्र फडणवीस “बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलत होते. हा कायदा किती खराब झाला आहे, याविषयी सांगत होते. याबाबतची सत्तारुढ पक्षाच्या सदस्यांची तळमळ बघावी. बीडमध्ये सत्ता रुढ पक्षाशी संबंधित पदाधिकारी हे तिथे गोळीबार करतात. पण कौटुंबीक कारणाने नाही, अध्यक्ष महोदय जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार होतो” असं फडणवीस तातडीने बोलत होते.
दुसरीकडे मात्र, त्यांच्या पाठी बसलेले गिरीश महाजन डुलकी घेतअसताना पाहायला मिळाले. त्यावेळी शेलार यांनी त्यांना कोपराने खुणावलं. तेव्हा महाजन खडबडून जागे झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळू लागले तेव्हा शेलार हाताची अॅक्शन करून गोळीबार असं म्हणताना या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
