🕒 1 min read
मुंबई : मुंबईत मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे.शिवसेनेनं मुंबईमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा भाजपच्या टीकेनंतर भलतीच चर्चेत आली आहे.
भाजप आध्यामिक आघाडीने या मुद्द्यावरून सेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत. आचार्य तुषार भोसले यांनी ट्वीट करत आम्हाला मंदिरांत घंटा बडवणारा हिंदु नको तर अजान स्पर्धेचं आयोजन करणारा हिंदु हवा. आणि हो कोणीही आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, ते सोडून आता आम्हाला १ वर्ष झाले आहे असं म्हणत सेनेला टोला लगावला आहे.
आम्हाला मंदिरांत घंटा बडवणारा हिंदु नको तर अजान स्पर्धेचं आयोजन करणारा हिंदु हवा. आणि हो कोणीही आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, ते सोडून आता आम्हाला १ वर्ष झाले आहे.#बदललेली_शिवसेना pic.twitter.com/x8862poY9E
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) November 30, 2020
दरम्यान, आयोजक शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी या स्पर्धेसंदर्भात टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. अजानमध्ये प्रचंड गोडवा असून अजानचं मला नेहमीच अप्रूप वाटत राहिलं आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी अजानची स्पर्धा घेण्याचं माझ्या मनात आलं. अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस देण्यात येईल. या स्पर्धेचा खर्च शिवसेना करणार आहे,’ असं ते म्हणाले.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूका २०२२ मध्ये होणार असल्या तरी भाजप पाठोपाठ आता शिवसेना देखील या निवडणुकांसाठी सक्रिय होत असल्याचं दिसून येत आहे. भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचा शुद्ध भगवा फडकावणार असल्याची गर्जना केली होती. यानंतर, शुद्ध भगव्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच आता या स्पर्धेच्या अरोजनावरून देखील भाजप नेते शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- धक्कदायक : कोरोनाशी महिनाभर झुंज देणाऱ्या भाजप आमदाराचे निधन
- ‘…पण मुस्लीम उमेदवारला तिकीट देणार नाही’ भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, लोकसेवा आयोगाच्या परिक्षा होणार कधी?ठाकरे सरकारवर दानवे बरसले
- ‘ही सरकारच्या कामांची वर्षपूर्ती नव्हे तर लोकोपयोगी कामांचे विद्यमान सरकारने घातलेले वर्षश्राद्ध’
- शिवसेनेतर्फे लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन; स्पर्धेवरून भाजप-शिवसेनेत वादंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
