🕒 1 min read
औरंगाबाद : दशमेशनगर भागात २०१५ साली वृद्धाच्या घरात घुसून स्क्रू ड्राईवरच्या धाकाने मिश्रीलाल कन्हैया बरडीया यांच्या घरात सात लोकांनी जबरी चोरी करत, तब्बल दीड लाखांचा माल लांबवला होता. त्यावेळी सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु, सहा वर्षांपासून पोलिसाना गुंगारा देणाऱ्या मोक्का तील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पांडुरंग ऊर्फ गजानन प्रभाकर कचरे रा.जैन गल्ली अंबाजोगाई जि. बीड. असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बरडिया हे दशमेशनगर भागातील त्यांच्या घरी असतांना, पहाते साडे चारच्या सुमारास त्यांना घरात काही तरी तोडण्याचा आवाज आला. त्या आवाजाने ते उठले, अचानक त्यांच्या पाठीमागे स्क्रू ड्राईवर हातात घेऊन ३५-४० वर्षाचा माणूस आला त्याने त्यांना धमकावले, त्यामुळे ते घाबरून गेले. त्याच्या सोबत तेंव्हा आणखीन तीन जन होते. तेंव्हा त्यांनी बरडिया यांच्या घरातून १ लाख ५ हजार रुपये रोख आणि ५० हजारांचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी तपास करत, सुर्यकांत श्रीराम मुळे वय-२८ वर्ष, रा. गांधीनगर अंबेजोगाई बोड, विनोद दिंगबर गायकवाड, वय-३२ वर्ष ज्योतीनगर औरंगाबाद, गोरख रघुनाथ खळेकर, वय-२१ वर्ष, रा.सिरसवाडी,जि.जालना, सुनिल भावसाहेब पवार, वय-२४ वर्ष, रा. बाऊनी पांगरी, जि.जालना, नंदु पंढरीनाथ सिरसाठ, वय-२३ वर्ष, रा.धावडा, ता.जि.बुलढाणा, राजेंद्र श्रीराम कळसे, वय-३० वर्ष रा.नागसेननगर अंबेजोगाई जि.बीड. या सहा आरोपींना अटक केली होती. परंतु, पांडुरंग ऊर्फ गजानन प्रभाकर कचरे रा.जैन गल्ली अंबाजोगाई जि. बीड. हा तेंव्हा पासून पोलिसांना गुंगारा देत होता.
गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांना गुप्त बातमी मिळाली कि, पांडुरंग ऊर्फ गजानन प्रभाकर कचरे हा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे आला आहे. त्यांनी तत्काळ सूत्रे हलवत गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना त्यांच्या पथकासोबत अंबाजोगाई येथे पाठवले तिथे त्यांनी सापळा लावत पांडुरंग ऊर्फ गजानन प्रभाकर कचरे याला ताब्यात घेतले, शहरात आणल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयासमोर हजार करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
