Share

महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; भाजपच्या आमदाराविरोधात राष्ट्रवादी करणार पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Published On: 

🕒 1 min read

पुणे : भाजपचे पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरून शिवीगीळ केली. कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत केलेली शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने आज आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. हे आंदोलन आमदार सुनील कांबळे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले कि, ‘आमदारा सुनील कांबळे यांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

संबंधित महिला अधिकारी ह्या महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात आमदार कांबळे यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेता त्यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यावर चिडलेल्या कांबळे यांनी या महिला अधिकाऱ्याला अगदी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली.हा घडलेला प्रकार एकदम घाणेरडा आहे.

सुनील कांबळे हे आमदार आहेत.त्याना अशी भाषा वापरणे शोभत नाही.पुणे महानगरपालिके ची सत्ता भाजपच्या हातात आहे. भाजपने काहीही काम केले नाही. शहरातिल अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, दुसरीकडे भाजपचे आमदार महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतात आम्ही या घटनेचा निषेध करतो. आम्ही पुणे पोलीस आयुक्तांकडे आमदार सुनिल कांबळे याची तक्रार करणार आहोत. असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!