Share

उपलब्ध लसींच्या प्रमाणात ९२ टक्के लसीरकण, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

Published On: 

औरंगाबाद : कोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेची भीती असूनही कायम आहे. त्यामुळे लसीकरण हाच एक पर्याय आहे. जास्तीत जास्त लसीरकण व्हावे यासाठी राज्य सरकारच्या वतीनेही प्रयत्न करण्यात येत आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातही लसीकरणाची चांगली गती असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या लसींपैकी ९२ टक्के लसीकरण करण्यात आले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी सात हजार खाटा उपलब्ध आहेत. त्यातील ३ हजार २३० खाटा ऑक्सिजनच्या तर ५५२ खाटा व्हेंटिलेटरच्या उपलब्ध असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिलीय. जिल्ह्यामध्ये ३६० अम्ब्युलन्स कार्यान्वित आहेत. आता लॉकडाऊन उघडण्यात आल्याने व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन निर्मिती करणारे आठ प्लांट कार्यान्वित करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात ११ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार करण्यात येत आहे. आणखी काही प्लांट येत्या काही दिवसात सुरू करण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली. पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही जिल्ह्यातील कोरोना व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!