🕒 1 min read
मुंबई : अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. आज अमिताभ बच्चन यांच्याकडे सर्व काही आहे. मात्र त्यांच्या आयुष्यातील एक टप्पा असा ही होता, जेव्हा त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. हा ‘तो’ काळ होता जेव्हा अमिताभ यांच्यावर आर्थिक संकट आलं होतं. जेव्हा अमिताभ बच्चन वाईट आर्थिक टप्प्यातून जात होते. अलीकडेच अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) पुन्हा तोच वाईट काळ आठवला असून याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला. हे ऐकूण चाहते देखील भावूक झाले होते.
दरम्यान अभिषेकने ‘द रणवीर शो’ पॉडकास्टमध्ये (‘The Ranveer Show’ podcast) हजेरी लावली होती. यावेळी अभिषेकने त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकाटा विषयी सांगितले. अमिताभ यांनी त्यांच्या इथे काम करणाऱ्या लोकांकडून उधारीवर पैसे घेतले होते जेणे करून त्यांच्या कुटुंबाला जेवण मिळेल. ‘कुटुंबाच्या आजुबाजुला रहायला मला आवडतं. माझ्या वडिलांना रात्रीचे जेवण कसे मिळेल हे माहित नसताना, मी बोस्टनमध्ये (Boston) राहू शकत नव्हतो. माझ्या वडिलांना आमच्या इथे कामाला असणाऱ्या लोकांकडून पैसे उधारीवर घ्यावे लागत होते, जेणे करून ते आम्हाला जेवण देऊ शकतील. त्यामुळे बोस्टनमध्ये न राहता त्यांच्या जवळ राहण्याची गरज आहे असे मला वाटले,’ असे अभिषेक म्हणाला.
त्यानंतर अभिषेकने फोन केला आणि कॉलेज सोडून त्यांच्यासोबत राहण्याची इच्छा सांगितली. हे ऐकल्यानंतर अमिताभ भावूक झाले होते. त्याआधीच अभिषेकने अमिताभ यांना त्याला अभिनेता होण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अभिषेक भारतात परतला. नुकतेच केबीसीचे १ हजार एपिसोड (KBC) पूर्ण झाले आहेत. त्यावेळी अमिताभ हे भावूक झाले आणि त्यांनी केबीसीची ऑफर कशी स्विकारली ते सांगितले होते. केबीसीची ऑफस जेव्हा त्यांना मिळाली होती तेव्हा त्यांच्यावर आर्थिक संकट आले होते. त्यांना चित्रपटसृष्टीत काम मिळत नव्हते. या कारणामुळे त्यांनी केबीसी करण्यासाठी होकार दिला होता. त्यांचा जीवनप्रवास आणि त्यावर कशी मात केली हे पाहून चाहत्यांना देखील धक्का बसला.
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे काही फोटो पहा.
महत्वाच्या बातम्या
- ‘उध्दव ठाकरेंचे शेतकरी प्रेम पुतणा मावशीचे; प्रविण दरेकरांची मुख्यमंत्र्यावर टीका
- ‘राज्याला लुटण्याचा अधिकार हा फक्त मविआ मंत्र्यांना दिला आहे’
- माझ्या जिल्ह्याची ‘ही’ ओळख पुसून काढायची आहे – विजय वडेट्टीवार
- एजाज पटेलने आयपीएलमध्ये खेळण्याबाबत केले मोठे वक्तव्य
- हेच का तुमचे संस्कार?; शाळेवर हल्लाप्रकरणी जितेंद्र आव्हाड संतप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
