🕒 1 min read
परळी : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (यूपीएससी) परीक्षा 2020 चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातून 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. कोरोनातील कठीण काळात UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. अशातही प्रत्येक संकटांवर मात करून या विद्यार्थ्यांनी देशसेवा करण्यासाठी अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
यामध्ये अनेक इंजिनिअर्सचा समावेश असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, परळी वैजनाथ येथील यशवंत अभिमन्यू मुंडे यांने नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. संपूर्ण भारतातून ५०२ व्या स्थानी येत त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिमन्यूने इंजिनिअरिंग केल्याची माहिती त्याने दिली आहे.
‘मीसुद्धा अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगा असून माझे वडील निवृत्त क्रीडा शिक्षक आहेत तर आई गृहिणी आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण परळीत झाल्यानंतर लातूरमध्ये मी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी नोकरी न करता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला,’ असं यशवंत याने सांगितलं आहे.
दरम्यान, अनेक जण मोठे मोठे क्लास आणि कोचिंग घेत या परीक्षांची तयारी करत असतात. यासाठी तसे पैसे देखील मोजावे लागतात. मात्र, आपल्या तयारी बाबत बोलताना यशवंत सांगतो, ‘दररोज 10 तास मी अभ्यास केला, कुठलेही क्लासेस मी लावलेले नाहीत. तरुणांमध्ये जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कुठलेही उद्दिष्ट अशक्य नाही. इतरांकडून तर प्रेरणा घ्याच पण आत्मप्रेरणा आणि अभ्यासाच्या बाबतची निष्ठा प्रामाणिक असली पाहिजे.’ यशवंतच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळून UPSC मध्ये महाराष्ट्राला घवघवीत यश मिळेल अशीच अपेक्षा केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईतील शाळा सुरु होणार ? महापौर पेडणेकर यांनी दिली ‘ही’ माहिती
- ‘जर त्या परीक्षार्थींची आडनावे ठाकरे, पवार, थोरात असती तर ?’ राणेंचा प्रहार
- ‘आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे, तेव्हा…’; फडणवीसांच्या विधानामुळे चर्चांना उधाण
- सावधान ! पुढच्या सहा तासात चक्रीवादळाचा धोका; तर राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता
- वय वर्ष २१ आणि मेहनीतीची पराकाष्टा! मध्यमवर्गीय कुटुंबातील नितीशा जगतापनं UPSC केली क्रॅक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
