Share

Abdul Sattar : “शिंदे आणि शिवसेनेत थोडा थोडा वाद सुरू होता, त्यांच्या खात्याच्या…”; अब्दुल सत्तारांनी केला मोठा खुलासा

Published On: 

मुंबई : गेल्या आठवड्यात विधानसभेच्या विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी बोलताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी ते म्हणाले होते कि, येणाऱ्या काळात आम्ही १०० आमदार निवडून आणू. यानंतर आता शिंदेंच्या या वक्तव्याची पुनरावृत्ती शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे. एकनाथ शिंदे हा माणसं जोडणारा नेता आहे. सध्या शिंदेंच्या गटात 50 आमदार असले तरी त्याचे 100 आमदार कधी होतील आणि म्हणू नये पण फडणवीसांचीही अडचण होऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले, एकनाथ शिंदे माझे गॉड फादर आहे. मात्र शिंदे आणि शिवसेनेत थोडा थोडा वाद सुरू होता. शिंदेंच्या खात्याच्या परस्पर बैठका घेतल्या जात होत्या. शिंदे खूप नाराज होते. तेच तुम्हाला अधिक सांगू शकतात. मी शिवसेनेत गेलो. तेव्हा शिवसेनेचे कोणतेही पदाधिकारी सिल्लोडमध्ये नव्हते. हजार मतेही शिवसेनेची नव्हती. शिंदेंनी आपल्याला काय पाहिजे हे त्यांनी कधीही म्हटलं नाही, असं ते म्हणाले.

यानंतर पुढे शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी आमची भावना होती. रात्री दोन वाजताही शिंदे फोन उचलतात. ते धावून येतात. काही नेत्यांना भेटीची मागणी केली तरी ते भेटायचे नाही. मला कोरोना झाल्यावर लिलावतीत दाखल केले होते. तेव्हा ते किट्स घालून मला भेटायला आले. मलाच नाही तर अनेकांना ते भेटायला गेले. एकनाथ शिंदेंसारखा नेता आणि मुख्यमंत्री आतापर्यंत पाहिला नाही, असंही सत्तार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!